तुम्हाला मराठी किंवा हिंदी FY BA च्या notes हव्या असतील तर तुम्ही ही पोस्ट वाचू शकतात
FY BA एक टोकरी भर मिट्टी कहानी pdf .
जेव्हा मी जात चोरली होती BA Notes
भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील ऊर्जा साधनसामग्रीविषयक आव्हाने स्पष्ट करा.
भारतीय आर्थिक पर्यावरण G 1
FY BA sam1 economics
प्रास्ताविक : आर्थिक विकास आणि राहणीमानाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या बाबतीत ऊर्जा ही आवश्यक बाब आहे. ऊर्जेची पुरेशा प्रमाणात उपलब्धता नसेल तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. भारतात कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू, जळाऊ लाकूड अशा अनेकस्रोतांपासून ऊर्जा मिळते. स्थूलमानाने ऊर्जा स्रोतांची विभागणी पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा स्रोत या दोन प्रकारांत करता येते. पारंपरिक स्रोताचेव्यापारी स्रोत व बिगर व्यापारी स्रोत असे दोन प्रकार पडतात, ऊर्जेच्या बाबतीतील आव्हाने : ऊर्जेची उपलब्धता, विकास, वापर, वितरण वगैरे बाबतीत देशात ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्याचेआव्हान देशापुढे आहे
.https://youtu.be/O73E8hKrMo8?si=h2KLTztCssGIB1w0
1) उपलब्धता वाढविणे :
गरजेच्या मानाने कमी उपलब्धता ही देशातील ऊर्जेच्या बाबतीतील महत्त्वाची समस्या आहे. ऊर्जेच्या व विशेषतः व्यापारी ऊर्जेच्या बाबतीत ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे. ऊर्जेच्या मागणीत होणाऱ्या वाढीच्या मानाने पुरवठ्यात कमी वेगाने वाढ होत असल्याने ऊर्जेचा व जागवतो. त्यामुळे उत्पादन अडथळा येतो. उर्जेची उपलब्धता वाढविण्याचे आव्हान पुढे आहे
2) नूतनीकरण करता येणाऱ्या ऊर्जेचा विकास :
देशात नूतनीकरण करता येईल अशा ऊर्जेच्या व्यापारी स्रोतांची फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे नूतनीकरण करता येणार नाही अशा तेल, कोळसा या स्रोतांवरच जास्त अवलंबून राहावे लागते. नूतनीकरणकरता येणाऱ्या उर्जेचा विकास करण्याची गरज आहे.
3) व्यापारी ऊर्जेची वाढ :
व्यापारी ऊर्जेची वाढ कमी प्रमाणात झालेली आहे. ऊर्जेच्या विविध स्रोतांचा मागणी-पुरवठा एक मेकांशी जुळत नाही याचे एक कारण व्यापारी ऊर्जेची कमी वाढ हे आहे. व्यापारी ऊर्जेच्या ऐवजी बिगर-व्यापारी ऊर्जेचा वापर फारसा होत नाही. तो वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान पुढे आहे.
4) ग्रामीण व शहरी यात ऊर्जा वापरातील फरककमी करणे :
ऊर्जा वापराच्या बाबतीत देशाच्या ग्रामीण व शहरी भागात तफावत दिसते. व्यापारी ऊर्जा वापराबाबत शहरी व ग्रामीण भागाच्या बाबतीत असमतोल आहे. जेथे एकूण लोकसंख्येपैकी के वळ २६ टक्के लोक संख्या राहते, अशा शहरी भागात व्यापारी ऊर्जेचा वापर ८० टक्के होतो, तर ग्रामीण भागात हा वापर २० टक्के आहे. व्यापारी ऊर्जेची कमी उपलब्धता व बिगर-व्यापारी ऊर्जा साधनांची कमतरता, यामुळे ग्रामीण भागावर ऊर्जेची उपलब्धता कमी राहते. विजेचा तुटवडा जाणवतो तेव्हा भारनियमन करताना ते ग्रामीण भागात अधिक प्रमाणात केले जाते.
5) कमी उर्जेत अधिक उत्पादन :
उत्पादनाची उपकरणे, यंत्रे ही कालबाह्य, जुनाट झालेली असतील तर अशी यंत्रे चालविण्यासाठी आवश्यक तेपेक्षा अधिक ऊर्जेची आवश्यकता भासते. भारतात अनेक उद्योगात जुनाट यंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे ऊर्जेच्या प्रमाणापेक्षा अधिक वापर केला जातो. कमी उर्जेचा वापर करून अधिक उत्पाद वाढविण्याचे आव्हान देशापुढे आहे
6) वितरणातील अपव्यय :
ऊर्जेचा पुरवठा होत असताना किंवा वितरण होत असताना मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वाया जाते. वीजपुरवठ्याच्या बाबतीत ही समस्या गंभीर स्वरूपाची आहे. वितरण होत असताना मोठ्या प्रमाणात वीज वाया जात असल्या विजेचा कार्यक्षमपणे वापर होत नाही. वितरणातील अपव्ययाचे नियंत्रण करणे आवश्यक आहे
7) अकार्यक्षम ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची कार्यक्षमता वाढविणे :
ऊर्जानिर्मिती करणारे प्रकल्प कार्यक्षम नाहीत ही देखील ऊर्जेच्या बाबतीतील एक महत्त्वाची समस्या आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांतून ऊर्जेची निर्मिती होत असते. असे ऊर्जानिर्मिती करणारे प्रकल्प कार्यक्षमतेने चालवले जात नाहीत. त्यामुळे ऊर्जानिर्मितीच्या खर्चातही वाढ होते. त्यामुळे कमी किमतीत ऊर्जेची उपलब्धता होण्यात अडचणी येतात. उर्जा निर्मिती प्रकल्पाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान देशापुढे आहे
समारोप :
ऊर्जेचा पुरवठा वाढविण्यासाठी ऊर्जा स्रोतांची उत्पादक ता वाढविण्यात यावी. त्यामुळे आहे त्याच ऊर्जा स्रोतांच्या साहाय्याने अधिक ऊर्जानिर्मिती होईल. बिगर-व्यापारी स्रोतांच्या वापरात नवीन तंत्राचा अवलंब करून सुधारणा करावी. उदाहरणार्थ, स्वयंपाकासाठी साध्या चुलीऐवजी आधुनिक चुलींचा वापर. त्यामुळे ऊर्जेचा अधिक कार्यक्षमपणे वापर करणे शक्य होईल.