जेव्हा मी जात चोरली होती BA Notes

जेव्हा मी जात चोरली होती FY BA मराठी विषय Notes 

लेखक परिचय बाबुराव बाबुल

 जन्म : १७ जुलै १९३०, मृत्यु २६ मार्च २००८. विद्रोही कवी, कथाकार व कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध एस. एस. सी. पर्यंत शिक्षण, बालपणापासूनच लेखनाची ऊर्मी. 'जेव्हा मी जात चोरली होती' (१९६३), "मरण स्वस्त होत आहे' (१९६९) हे कथासंग्रह प्रसिद्ध. या कथासंग्रहांबरोबर त्यांची 'सूड' ही दीर्घका प्रसिद्ध आहे. त्यांच्या 'पावश्या' (१९७१), 'पाषाण' (१९७२), 'भूमिहीन' (१९७९), 'देश' (१९८०), 'अघोरी' (१९८३), 'कॉडी' (२००२) आदी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 'बेदाआधी तू होतास' हा त्याचा कवितासंग्रह व 'दलित साहित्यांचे क्रांतिविज्ञानट (१९८१) हा तत्त्वलक्षी समीक्षाग्रंथ प्रसिद्ध आहे. आंबेडक




री भारत १ व २ हे चरित्रात्मक खंड प्रसिद्ध आहेत. माणसाला केंद्रबिंदू मानून लेखन, जीवनाभूती, दलितांचे दैन्य, दारिद्र्य व असहा भोगांचे प्रभावी चित्रण, आंबेडकरी विचारांवर समर्पक भाष्य हे त्यांच्या लेखनाचे ठळक विशेष आहेत.



जेव्हा मी जात चोरली प्रस्तावना 

बाबूराव बागूल यांच्या 'जेव्हा मी जात सोडली होती' या कथा संग्रहातील प्रस्तुत कथा आहे माणसा- माणसांमध्ये भेद निर्माण करण्यास जाती व्यवस्था ही कारणीभूत असते. मानवातील मूलभूत क्षमताचा विक स करून देण्यामध्ये जाती व्यवस्था ही अत्यंत महत्त्वपूर्ण कारण ठरते. प्रस्तुत कथेतील नायक हा स्वत:ची आणि कुटूंबाची प्रगती व्हावी, आर्थिकपरिस्थिती सुधारावी यासाठी स्वत:ची जात लपवून रेल्वे मध्ये लागलेली नोकरी नेटाने करत असतो. त्याच्या सभोवताली त्याच्याप्रमाणे काम करणारी माणसे ही मनोवादी प्रवृत्ती जोपासणारी असतात. कथा नायकाच्या राहणीमानावरून नायकाला ही मंडळी उच्चवर्णीय समजतात. उच्चनीचतेमुळे कथा नायकाच्या कामावरील वातावरण हे कायमच स्फोटक आणि जातीभेद व जातीय पण - अस्मिता यांनी द्वेषपूर्ण झालेले असते. कथा नायकाची खरी जात समजल्यानंतर त्याला झालेली मारहाण आणि मनुवादी प्रवृत्तीचा विजय या सगळ्यातून ही कथा अंतर्मुख करते.


जेव्हा मी जात चोरली होती कथा पात्र

  • कधीचा नायक
  • काशिनाथ सपकाळ
  • रामचरण
  • रणछोड
  • माता प्रसाद.  

जेव्हा मी जात चोरली कथा  video 

Video please copyrighted
उपयुक्त माहिती मिळाली असेल तर कमेंट करा 
काही माहिती चुकली असेल तर कळवण्यासाठी मेल करा
तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिक वर नोट हवी आहे ते मला कळवा 
Read more

थोडे नवीन जरा जुने

संपर्क फॉर्म